पोलीस ठाण्याच्या कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:25+5:302021-03-09T04:35:25+5:30
(फोटो : समीर सुतके ०८) उमरगा : उमरगा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळून आगळ्यावेगळ्या पध्दतीने ...

पोलीस ठाण्याच्या कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती
(फोटो : समीर सुतके ०८)
उमरगा
: उमरगा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळून आगळ्यावेगळ्या पध्दतीने जागतिक महिला दिन साजरा केला. पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांनी दिवसभर ठाण्याचा कारभार आपल्या खाद्यावर घेऊन कर्तव्यदक्ष असल्याचे दाखवून दिले.
विद्यार्थ्यांना ‘स्कूल डे’ निमित्त शिक्षक होण्याची संधी मिळत असते. याच धर्तीवर पोलीस ठाण्यातील महिलांना ही संधी देण्यात आली. त्यात पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल सुनीता राठोड यांनी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली बबिता शिंदे, बबिता चव्हाण, सारिका कदम, सोनी काळे, ज्योती घुगे या महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळला. तत्पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले व पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या हस्ते ठाण्यातील सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या या वेगळ्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात असून, महिलांचा उचित सन्मान केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.