शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 18:17 IST

येत्या 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. विजेत्यांना तब्बल 2 कोटींची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्रातील कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमींसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील सर्वात मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा स्पर्धेच्या आयोजनाचा मान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याला मिळाला आहे. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि उस्मानाबाद तालीम संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची ३१ जून रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान धाराशिव जिल्ह्याला मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नही झाले. अखेर हा बहुमान धाराशिवला मिळाला. त्यानुसार आता १ ते ५ नोव्हेंबर असे पाच दिवस शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडासंकुलावर कुस्तीचा थरार रंगणार आहे. उद्घाटन व समारोपासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील ४५ संघांचे मिळून तब्बल ९०० पैलवान सहभागी होतील. ज्यात साडेचारशे खेळाडू माती गटाचे, तर उर्वरित साडेचारशे गादी गटाचे असतील. चांदीची मानाची गदा व ३० लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी असे पहिल्या बक्षिसाचे स्वरूप आहे, तर उपविजेत्यास ट्रॅक्टर बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धा आयोजनाचा मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व धाराशिव कुस्ती तालीम संघास मिळाला आहे. तब्बल १ लाख कुस्तीप्रेमी प्रेक्षक बसतील, अशी तगडी व्यवस्था क्रीडासंकुलावर करण्यात येईल, असे आयोजक पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

2 कोटींची बक्षिसे...महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २० गटांमध्ये होईल. या प्रत्येक गटातील विजेत्या पैलवानास बुलेट, तर उपविजेत्यास अन्य कंपनीची दुचाकी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. सोबतच १२ लाखांची उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत, असे आयोजक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाMaharashtra Kesriमहाराष्ट्र केसरीUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदWrestlingकुस्ती