शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

परंड्यात यंदा ‘हेवीवेट’ कुस्ती! आरोग्यमंत्र्यांना यावेळी उद्धवसेना अन् शरद पवार गटाचेही आव्हान

By चेतनकुमार धनुरे | Updated: November 2, 2024 11:14 IST

Maharashtra Assembly Election 2024 : परंड्यातून मंत्री तानाजी सावंत पुन्हा मैदानात आहेत. माजी आ. राहुल मोटेंना शरद पवार गटाने, तर रणजित पाटील यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली आहे. आघाडीतून यावेळी येथे दोन उमेदवार झाले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : धाराशिव : महाविकास आघाडीत अखेरपर्यंत मार्ग न निघालेल्या जागांमध्ये परंडा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवाय, तो आरोग्य मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणूनही राज्यभर चर्चेत आहेच. मंत्री तानाजी सावंत यांना येथील मैदानात यावेळी उद्धवसेना व शरद पवार गटाच्या पैलवानांना सामोरे जावे लागणार आहे. 

परंड्यातून मंत्री तानाजी सावंत पुन्हा मैदानात आहेत. माजी आ. राहुल मोटेंना शरद पवार गटाने, तर रणजित पाटील यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली आहे. आघाडीतून यावेळी येथे दोन उमेदवार झाले आहेत. असे असले तरी सेनेच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा आघाडीलाच होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. तर दुसरीकडे आघाडीच्या मतांचे विभाजन होऊन महायुतीला फायदा होण्याची शक्यता चर्चिली जात आहे. जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास वेगळेच चित्र येथे दिसू शकते.

मराठा उमेदवारावर सर्वांचेच आहे लक्ष... मराठा आरक्षण आंदोलनाला परंडा मतदारसंघातून मोठे समर्थन मिळाले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास काही अनपेक्षित निकालही येथून येऊ शकतात. उद्धवसेनेचे रणजीत पाटील यांच्याविषयीच्या सहानुभूतीमुळे बरीच मते त्यांच्याकडे वळू शकतात. यामुळे मतविभाजन येथे कळीचा मुद्दा आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?मागच्या लोकसभा निवडणुकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना ८१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हाचे मुद्दे आता पूर्णत: राहिले नसले तरी ती वावटळ अजूनही पूर्णपणे शमलेली नाही. लोकसभेला सोयाबीन दराचा मुद्दा मतदारांनी उचलून धरला होता. आताही तो आहेच. त्यातून महायुती कसा मार्ग काढते? यावर बरेच काही अवलंबून आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देआरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मतदारसंघात आणलेला निधी तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा महायुतीकडून आहे.प्रतिस्पर्ध्यांनी सोयाबीनचा घसरलेला दर, भ्रष्टाचार, परजिल्ह्यातील उमेदवार या मुद्यांसोबतच त्यांच्या काळातील सिंचन सुविधांच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४paranda-acपरांडाdharashivधाराशिवmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक