सोयाबीनचे नुकसान, शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST2021-09-08T04:38:59+5:302021-09-08T04:38:59+5:30
उमरगा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील काढणीला आणि राशीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोळसूर कल्याणी येथील ...

सोयाबीनचे नुकसान, शेतकरी संकटात
उमरगा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील काढणीला आणि राशीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोळसूर कल्याणी येथील अशोक व्यंकट ढगे व नामदेव ढगे यांनीही सोयाबीनची अघोटी पेरणी केली. चार वेळा फवारणी, त्यात महागडे बियाणे, खत वेळेत दिले. दोन वेळा कोळपणी केली. निसर्गाची वाट न पाहता तुषार सिंचनाने पाणी दिले. पिकाची वाढही चांगली झाली. इतर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फुले लागली नव्हती, तेंव्हा ढगे बंधूंच्या शेतातील सोयाबीनच्या एका रोपाला ८० ते ८५ शेंगा दिसत होत्या. परंतु, सततच्या पावसामुळे पिकात पूर्णपणे पाणी साचले आहे.
काही शिवारात अघोटी पेरणी झाल्याने सद्यस्थितीत पिके विशेष करून सोयाबीन राशीसाठी तयार आहेत. परंतु, सतत पाऊस होत असल्याने सोयाबीनला जागेवर मोड फुटलेले दिसत आहेत. पावसाचा खंड, अघोटी पेरणी व सद्यस्थितीचा पाऊस पाहता सदर शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक सहाय करावे. त्यात एनडीआरएफ अंतर्गत अशा पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना सहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.