वीज तोडल्याच्या रागातून लाईनमनला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 19:02 IST2019-02-23T19:02:06+5:302019-02-23T19:02:52+5:30

‘तू आमची लाईट का बंद केली’ असे म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली़

Lineman beaten due to breakdown of electricity | वीज तोडल्याच्या रागातून लाईनमनला धक्काबुक्की

वीज तोडल्याच्या रागातून लाईनमनला धक्काबुक्की

उमरगा (उस्मानाबाद ) : वीज तोडल्याच्या कारणावरून महावितरणच्या लाईनमनला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी दोघाविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शुक्रवारी सकाळी तालुक्यातील आलूर येथे घडली़

उमरगा तालुक्यातील आलूर येथील शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी महावितरणमध्ये कार्यरत असलेले लाईनमन भिवराव मेघू चव्हाण हे इतर प्रशिक्षणार्थींसमवेत काम करीत होते़ त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी वीज बील भरले नसल्याच्या कारणावरून ‘तू आमची लाईट का बंद केली’ असे म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली़ तसेच ‘तुम्हाला गावामध्ये फिरू देत नाही, मारून टाकतो’ अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार लाईनमन भिवराव चव्हाण यांनी मुरूम ठाण्यात दिली़ चव्हाण यांच्या तक्रारीवरून युवराज चोकलू पवार, हरी तुळशीराम राठोड (दोघे रा़ आलूर) या दोघाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Lineman beaten due to breakdown of electricity