अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:27+5:302021-02-06T04:59:27+5:30
उस्मानाबाद शहरातील तुळजापूर नाका परिसरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसरात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, ...

अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे उपोषण
उस्मानाबाद शहरातील तुळजापूर नाका परिसरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसरात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लहुजी शक्ती सेना आक्रमक झाली आहे. शहरात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलनकांनी तुळजापूर येथील नगर परिषदेअंतर्गत अनुकंपाधारक विशाल लोढे व १६ अनुकंपाधारकांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व इतर कर्मचाऱ्यांवर ॲट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, विठ्ठल लोंढे व इतर १८ कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे १ ऑक्टोबर १९९३ पासून सेवेत सामावून घेण्यात यावे आदी मागण्या लावून धरल्या होत्या. यावेळी बालाजी गायकवाड, संभाजी कांबळे, संतोष हणमंते, संतोष मोरे, अजय कांबळे, सुभाष गव्हाणे, बाळासाहेब कांबळे, मुकेश देडे, संतोष गायकवाड, डॉ. मारुती क्षीरसागर, अमोल क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.