१२ केंद्रांवर मिळणार आज कोविशिल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:03+5:302021-08-18T04:39:03+5:30
कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्यास आता नागरिक जागरुक बनले आहेत. त्यातच आता परराज्यात जाण्यासाठी अनेक ठिकाणी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य ...

१२ केंद्रांवर मिळणार आज कोविशिल्ड
कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्यास आता नागरिक जागरुक बनले आहेत. त्यातच आता परराज्यात जाण्यासाठी अनेक ठिकाणी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी वाढली आहे.
दरम्यान, बुधवारी कोविशिल्ड लसीचे ५ हजार ३०० डोस आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. मुरुम, लोहारा, सास्तूर, तेर, भूम, वाशी येथील ग्रामीण रुग्णालयांत ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या प्रत्येकी २५० जणांना पहिला डोस मिळणार आहे, तर १५० जणांना ऑन द स्पॉट दुसरा डोस मिळेल. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय तसेच तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयांतही ऑनलाईन नोंदणी केलेल्या ३०० जणांना पहिला, तर २०० जणांना ऑन द स्पॉट दुसरा डोस देण्यात येईल. उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात ऑनलाईन नोंदणी केलेल्या २५० जणांना पहिला, तर २०० जणांना ऑन द स्पॉट दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
हे लसीकरण उपरोक्त १२ केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार असून, ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनीच दुसऱ्या डोससाठी केंद्रावर यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.