कोरे, मुजावर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:51+5:302021-02-09T04:35:51+5:30

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पृरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनेलने वर्चस्व मिळवत १७ पैकी १२ सदस्य निवडून आणले होते. तर ...

Kore, Mujawar unopposed | कोरे, मुजावर बिनविरोध

कोरे, मुजावर बिनविरोध

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पृरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनेलने वर्चस्व मिळवत १७ पैकी १२ सदस्य निवडून आणले होते. तर काँग्रेस ०२, माजी सैनिक १, अपक्ष १, भाजप १ असे पक्षीय बलाबल आहे. सोमवारी सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी सदस्य विश्वनाथ देशमुख, माजी सरपंच सहदेव गायकवाड, विलास व्हटकर, प्रदीप शिवनेचारी, सोसायटीचे चेअरमन बलभीम शाईवाले, व्हाइस चेअरमन दत्तू कटकधोंड, अधिकृत पंच ओमजी शिंदे, भावसार समाजाचे अध्यक्ष सुभाष पतंगे, श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर हिरवे, शिवसेनेचे चनप्पा माळगे, दयानंद कारे, सतीश कारे, आकाश कटकधोंड, दिलीप देशमुख, माजी सैनिक प्रसाद हत्तीकाळे यांची उपस्थिती होती.

यावेळी नूतन सरपंच व उपसरपंचाचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून एस. एल. माशाळकर, सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. मुळे, तलाठी एस. एम. काझी, कोतवाल काशीनाथ दूधभाते यांनी काम पाहिले.

फोटो- गुंजोटी येथे नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एम. ए. सुलतान यांच्यासह नूतन सदस्य.

Web Title: Kore, Mujawar unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.