कळंब-लातूर रस्त्याचे काम पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:46+5:302021-09-19T04:33:46+5:30
उस्मानाबाद : कळंब-लातूर रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेअंतर्गतचे चालू काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूकीस मोठी ...

कळंब-लातूर रस्त्याचे काम पुन्हा सुरू
उस्मानाबाद : कळंब-लातूर रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेअंतर्गतचे चालू काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूकीस मोठी अडचण निर्माण होत होती. त्यासाठी हे काम तात्काळ चालू करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्यासह शिष्टमंडळाने मंगळवारी दिला हाेता. याची दखल घेत हे काम तातडीने सुरु केले आहे. २०१९-२० मध्ये कळंब-लातूर रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले हाेते. परंतु, मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम थांबले होते. काही ठिकाणी एका बाजुने काम पूर्ण झाले व बाजूने खडी अंथरून रस्ता खोदून ठेवला होता. तर काही भागात रस्ता केवळ उकरुन ठेवला होता. या सर्व प्रकारामुळे डिकसळ ते रांजणी या साखर कारखाना या परिसरात अनेक अपघातही झाले होते. त्यामुळे या रस्त्याचे बंद झालेले काम त्वरित सुरु करण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाकिधारी यांना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला हाेता. याची दखल घेत तातडीने काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, उपसभापती गुणवंत पवार, संतोष पवार, शाहुराज खोसे, सुरेश टेकाळे, पद्माकर पाटील, सुरेश पाटील, विनायक कवडे, भारत शिंदे, विश्वनाथ धुमाळ, भाऊसाहेब पाटील, अरुण पवार, किरण खोसे, संग्राम खोसे, राजकुमार कवडे, प्रविण शिंदे आदी उपस्थित हाेते.