काक्रंबा ग्रामपंचायतीची सूत्रे बंडगर दांपत्याच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:48+5:302021-09-24T04:38:48+5:30

काक्रंबा - येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील समर्थक अनिल बंडगर यांची ७ विरुद्ध ४ एवढ्या मताच्या फरकाने ...

The Kakramba Gram Panchayat is in the hands of the Bandagar couple | काक्रंबा ग्रामपंचायतीची सूत्रे बंडगर दांपत्याच्या हाती

काक्रंबा ग्रामपंचायतीची सूत्रे बंडगर दांपत्याच्या हाती

काक्रंबा - येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील समर्थक अनिल बंडगर यांची ७ विरुद्ध ४ एवढ्या मताच्या फरकाने वर्णी लागली. मताने निवड झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सूत्रे बंडगर दांपत्याच्या हाती आली आहेत.

१३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद वर्षा अनिल बंडगर यांच्याकडे आहे. माजी उपसरपंच यांचा नियाेजित कार्यकाळ संपुष्टात आला हाेता. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. मतदान घेण्यात आले असता, अनिल बंडगर यांनी विराेधकांचा ७ विरुद्ध ४ एवढ्या मतांनी पराभव केला. त्यामुळे आता ग्रामपंचायतीची सूत्रे बंडगर दांपत्याच्या हाती आली आहेत. निवड जाहीर हाेताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी सरपंच वर्षा बंडगर, ॲड. नागनाथ कानडे, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे, उमेश पांडागळे, निशिगंधा पाटील, शुभांगी साबळे, अरविंद कानडे, चित्रकला कोळेकर, सुभद्रा बचाटे, उमेश पाटील, शहाजी नन्नवरे, महेश सुरवसे, विनोद साबळे, प्रशांत बंडगर, महादू शिंदे, मेघराज साबळे, सोमा खताळ, विठ्ठल देवगुंडे, अमोल बंडगर, फुलचंद कोळेकर, बाळू बंडगर, बालाजी कोळेकर, अप्पाराव सरक, विपुल कंदले, नितीन पाटील, विशाल मस्के, अजित गडदे, करीम अन्सारी, शिवाजी सुरवसे, समाधान पाटील, शशिकांत पांडगळे आदी उपस्थित हाेते.

230921\img-20210923-wa0118.jpg

उपसरपंचपदी निवड होताच काक्रंबा ग्रामपंचायतीत फेटा बांधून सत्कार करण्यात आला

Web Title: The Kakramba Gram Panchayat is in the hands of the Bandagar couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.