जय भवानी क्रिकेट संघाने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:16+5:302021-01-23T04:33:16+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील झरेगाव येथे याराना क्रिकेट क्लबच्या वतीने हाफ पीच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना ...

जय भवानी क्रिकेट संघाने मारली बाजी
उस्मानाबाद : तालुक्यातील झरेगाव येथे याराना क्रिकेट क्लबच्या वतीने हाफ पीच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना १९ जानेवारी राेजी बक्षीस वितरण करण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव याराना क्रिकेट क्लबच्या वतीने संयोजक विजय तांबे, विकास सोनवणे, अनिकेत ढोकळे, सागर एडके व धनाजी सोनवणे यांनी हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धेत ३५ संघानी सहभाग नोंदविला असता, बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील जय भवानी क्रिकेट संघाने प्रथम तर झरेगाव येथील याराना क्रिकेट क्लबने दुसरा व बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील संभाजीनगर क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या संघांना फुलचंद धर्मे, सदाशिव सोनवणे, अमोल देशपांडे, तानाजी ढोकळे, शंकर धर्मे, ज्ञानेश्वर ढोकळे, विजय सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.