हातगाड्यांवर अग्नी प्रज्वलित करणे भाेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:46+5:302021-02-12T04:30:46+5:30

चाैघांविरुद्ध गुन्हा - पाेलिसांकडून कारवाईचा बडगा उस्मानाबाद : मानवी जीवितास धाेका निर्माण हाेईल, अशा रितीने खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर अग्नी प्रज्वलित ...

It was felt to light fires on handcarts | हातगाड्यांवर अग्नी प्रज्वलित करणे भाेवले

हातगाड्यांवर अग्नी प्रज्वलित करणे भाेवले

चाैघांविरुद्ध गुन्हा - पाेलिसांकडून कारवाईचा बडगा

उस्मानाबाद : मानवी जीवितास धाेका निर्माण हाेईल, अशा रितीने खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर अग्नी प्रज्वलित करणा-यांविरुद्ध पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्या-त्या पाेलीस ठाण्यात चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हातगाड्यांवर धाेकादायकरित्या अग्नी प्रज्वलित करण्यास मनाई आहे. असे असतानाही उस्मानाबाद शहरातील बाबू साळुंखे, आकाश मरगू मंजुळे यांनी बसस्थानकाच्या आवारात दाेन ठिकाणी हातगाड्यांवर धाेकादायकरित्या अग्नी प्रज्वलित केला. तसेच परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथील याेगेश साेमनाथ गिड्डे व भूम तालुक्यातील हाडाेंग्री येथील संदीप महादेव क्षीरसागर यांनी खाद्यपदार्थ तयार करण्याच्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलित केल्याचे समाेर आल्यानंतर पाेलीस पथकाने कारवाईचा बडगा उगारला. संबंधित चाैघांविरुद्ध त्या-त्या पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

चाैकट...

दुचाकीस्वारावर गुन्हा

कळंब येथील उत्तम रामकिसन आळणे यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून मानवी जीवितास धाेका निर्माण केला. या प्रकरणी कळंब पाेलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: It was felt to light fires on handcarts