पारगावातील घरकुलांची सीईओंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST2021-08-29T04:31:25+5:302021-08-29T04:31:25+5:30

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतीला पंतप्रधान आवास योजनेत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या ...

Inspection of households in Pargaon by CEOs | पारगावातील घरकुलांची सीईओंकडून पाहणी

पारगावातील घरकुलांची सीईओंकडून पाहणी

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतीला पंतप्रधान आवास योजनेत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी येथे भेट देऊन पडत्या पावसात घरकुलाची पाहणी केली, तसेच विविध कामांचा आढावाही घेतला.

वाशी तालुक्यातील विविध गावांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी भेटी दिल्या. यावेळी वाशीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे हेही उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेत पारगावला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

यावेळी गुप्ता यांनी घरकूल लाभार्थ्यांशी चर्चा करत अडीअडचणी जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या काळात राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या आराखड्याची पाहणी केली. यावेळी विस्तार अधिकारी राजू माचवे, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण, ग्रा.पं. सदस्य राजाभाऊ कोळी, सुशांत कोकणे यांच्यासह समाधान मोटे, मुकेश औताने, राहुल डोके, अमोल गायकवाड, सुजित औताने, जिल्हा स्तरावरील अनेक अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inspection of households in Pargaon by CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.