साडेचार लाख बालकांना देणार जंतनाशक गाेळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:14+5:302021-09-23T04:37:14+5:30
उस्मानाबाद - काेराेना तसेच अन्य कारणांमुळे जिल्ह्यात जंतनाशक गाेळ्या वाटप मागील काही महिन्यांपासून झालेले नव्हते. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध ...

साडेचार लाख बालकांना देणार जंतनाशक गाेळ्या
उस्मानाबाद - काेराेना तसेच अन्य कारणांमुळे जिल्ह्यात जंतनाशक गाेळ्या वाटप मागील काही महिन्यांपासून झालेले नव्हते. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आराेग्य विभागाने २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत माेहीम हाती घेतली आहे.
जागतिक आराेग्य संघटनेने सुमारे २८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष आढळून येत असल्याचे म्हटले आहे. बालकांच्या आराेग्याच्या दृष्टिकाेनातून ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. याबाबत ‘लाेकमत’ने ‘२८ टक्के बालकांत जंतदाेष, जंतनाशक गाेळ्या दिल्या का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले हाेते. या वृत्तानंतर आराेग्य यंत्रणेने खडबडून जागे हाेत २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जंतनाशक माेहीम हाती घेतली आहे. काेविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही माेहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषद आराेग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या माेहिमेच्या माध्यमातून जिल्हाभरातील १ ते १९ वयाेगटातील तब्बल ४ लाख ५१ हजार बालकांना गाेळ्या देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चाैकट...
जंतुसंसर्ग थांबविण्यासाठी हात स्वच्छ धुणे, स्वच्छतागृहाचा नियमित वापर करणे, पायात चपला अथवा बूट घालणे निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे, नखे नियमित कापणे गरजेचे आहे. दरम्यान, आराेग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गाेळ्या वाटपाची माेहीम हाती घेण्यात आली आहे. १ ते १९ वयाेगटातील प्रत्येकास या गाेळ्या खाऊ घालाव्यात.
-डाॅ. नितीन बाेडके, जिल्हा आराेग्य अधिकारी, उस्मानाबाद
चाैकट...
वडगावातून शुभारंभ...
जंतनाशक गाेळ्या वाटप माेहिमेस उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आराेग्य अधिकारी डाॅ. कुलदीप मिटकरी, वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुधाेळकर, मुख्याध्यापक फाटक, हेमंत पवार यांच्यासह शिक्षक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.