सिना-कोळेगाव धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:34+5:302021-09-27T04:35:34+5:30

सोनारी : उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सीना-कोळेगाव धरणाच्या पाण्याच्या पातळीत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चालू असलेल्या प्रवाहामुळे ...

Increase in water level of Sina-Kolegaon dam | सिना-कोळेगाव धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ

सिना-कोळेगाव धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ

सोनारी : उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सीना-कोळेगाव धरणाच्या पाण्याच्या पातळीत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चालू असलेल्या प्रवाहामुळे हळूहळू वाढ होत होती. मात्र, शनिवारी रात्री धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे अहमदनगरहून येणारी सीना नदी, पांढरेवाडी मध्यम प्रकल्प, संगोबा बंदारा, खैरी व नळी नदी आदी ठिकाणांहून पाण्याची आवक वाढली असून, यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या प्रकल्पात ७० टक्के टक्के पाणीसाठा झाला आहे.

परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरण हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर आहे. या धरणाचा उपयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने होतो. या धरणाची साठवण क्षमता १५०.४९ दलघमी (५.३ टीएमसी) एवढी आहे. सध्या धरणात १३० दलघमी एवढा पाणीसाठा यात. त्यापैकी मृत ६१ दलघमी तर जिवंत पाणीसाठा ६९ दलघमी म्हणजे ७० टक्के आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास १० हजार २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. यात परंडा तालुक्यातील ६ हजार ८०० हेक्टर तर करमाळा तालुका ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

चौकट...

सतर्कतेचा इशारा

शनिवारी रात्री धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, सिना कोळेगाव धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल. यानंतर, धरणातून कोणत्याही वेळी पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने, नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा ही देण्यात आला आहे.

आवाटी, भोत्रा, तसेच सीना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदी पात्रात मोटार पंप, पाइप व इतर साहित्य ठेऊ नये व पाणी सोडल्यावर कुणीही पाण्यात उतरू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अभय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

260921\img-20210926-wa0027.jpg

इ पीक नोंदणी करून देताना नितेश पाटील

Web Title: Increase in water level of Sina-Kolegaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.