कळंबमध्ये हौदात होणार विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:34 IST2021-09-19T04:34:03+5:302021-09-19T04:34:03+5:30
न. प.ने पाच प्रभागातील गणेशमूर्तीं संकलित करण्यासाठी आठ वाहनांची व्यवस्था केली आहे. त्या वाहनांतील कर्मचारी घरोघरी जाऊन मूर्ती ...

कळंबमध्ये हौदात होणार विसर्जन
न. प.ने पाच प्रभागातील गणेशमूर्तीं संकलित करण्यासाठी आठ वाहनांची व्यवस्था केली आहे. त्या वाहनांतील कर्मचारी घरोघरी जाऊन मूर्ती संकलन करतील. त्या मूर्ती विसर्जनस्थळावर आल्यावर त्यांची विधिवत पूजा करून आरती केली जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जनस्थळी कोरोना निर्बंधांमुळे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारीही लक्ष ठेवणार आहेत. गणेश विसर्जनासाठी सार्वजनिक मंडळाच्या आठ जणांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली. विसर्जनासाठी हौदात तराफा असून, यावर बसून श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. न. प.ने विसर्जनासाठी जय्यत तयारी केली असून, शहरवासीयांनी विसर्जन ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.