शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निरक्षर सालगड्याला केले शाळेवर शिपाई, पगार उचलली मात्र दुसऱ्यांनीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:41 IST

कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदिर येथे गावातीलच गुणवंत राऊत या व्यक्तीची तो निरक्षर असतानाही संस्थाचालकांनी शिपाई म्हणून नियुक्ती केली होती.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील देवळाली येथील एका शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याने गावातीलच एका निरक्षर व्यक्तीस अंधारात ठेवून शिपाई म्हणून नेमणूक केली. शिवाय, मागील पाच वर्षांपासून त्याचा पगारही पदाधिकारी उचलत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतन थांबवून चौकशी सुरु केली आहे.

कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदिर येथे गावातीलच गुणवंत राऊत या व्यक्तीची तो निरक्षर असतानाही संस्थाचालकांनी शिपाई म्हणून नियुक्ती केली होती. त्यास तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्याकडून मान्यताही घेतली होती. दरम्यान, ही शाळा २०१६ साली २० टक्क्याने अनुदानित झाली. तेव्हापासून नोव्हेंबर २०२०पर्यंत राऊत यांचे २० टक्के वेतन उचलले गेले. यानंतर नोव्हेंबर २०२०पासून शाळेला ४० टक्के अनुदान सुरु झाले. त्याप्रमाणे यापुढे राऊत यांच्या नावे वेतन उचलले गेले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्न विचारल्यानंतर चौकशी समितीचे गठन करण्यात आले. या समितीने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले आहे. गुणवंत राऊत यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे वेतन उचलले गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कारवाईचा बडगा उचलला जात आहे. तेव्हा या शाळेवर, संस्थेवर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

सुनावणीनंतर कारवाईचा निर्णय जागृती विद्यामंदिरात नियुक्ती देण्यात आलेले गुणवंत राऊत हे निरक्षर आहेत. राऊत यांना आपली नियुक्ती शाळेवर असल्याचे माहीत नव्हते व त्यांचे वेतन कोणी उचलले हेही माहीत नसल्याचे चौकशीत त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, हे पद रद्द करण्याच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव देण्यात आला असून, २७ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच शाळा, संस्थेवर नेमकी काय कारवाई अनुसरायची, याबाबत निर्णय घेण्यात येईल.-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादEducationशिक्षणSchoolशाळा