तुळजापूर (जि. धाराशिव) : शारदीय काळात नवरात्र महोत्सवाच्या तुळजाभवानी देवीचे लवकर दर्शन व्हावे, यासाठी भाविक पेड दर्शनाचा मार्ग अवलंबतात. मात्र, आता प्रचलित शुल्कामध्ये मंदिर प्रशासनाने थेट दुपटीने वाढ केली आहे. शिवाय, जास्तीत जास्त भाविकांना पंचामृत अभिषेक करता यावेत, यासाठी अभिषेकांची संख्याही शंभरने वाढवली आहे.
श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवाची सांगता ही ८ ऑक्टोबरला होणार आहे.
५० लाख
भाविक नवरात्रीत तुळजापूरला येण्याची शक्यता. या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. भाविकांची प्रचंड संख्या असल्याने अनेकजण पेड दर्शनाद्वारे लवकर दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करतात.
आता होणार ४०० अभिषेक
श्री तुळजाभवानी मंदिरात अभिषेक पूजेसाठी भाविकांची गर्दी असते. दररोज ३०० अभिषेक पूजा केल्या जातात. नवरात्र काळात भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदिर प्रशासनाने त्यांची संख्या ३०० वरून ४०० केली आहे.
व्हीआयपी पास हजाराला
सध्या देणगी दर्शन पाससाठी १ २०० रुपये आकारले जात होते. मात्र, नवरात्र काळासाठी शुल्क वाढवून ३०० रुपये करण्यात आले आहे. व्हीआयपी देणगी दर्शन पाससाठी ५०० रुपये शुल्क होते. त्यांची किंमत आता १ हजार रुपये करण्यात आली आहे.
स्पेशल गेस्ट पास २०० वरून ५०० रुपये करण्यात आला आहे. २ मंदिर संस्थानने स्वनिधीतून मंदिर डागडुजीचे काम सुरू केले आहे. सुमारे ५० कोटींहून अधिक रुपयांची ही कामे आहेत. या अनुषंगानेही दर्शन शुल्कात वाढ केल्याचे सांगण्यात आले.