मागणी एवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:55+5:302021-03-27T04:33:55+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण माेहिमेस प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात अद्यापर्यंत ३५ हजार ४३८ व्यक्तींना लसीचा पहिला डोस, ...

मागणी एवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा
उस्मानाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण माेहिमेस प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात अद्यापर्यंत ३५ हजार ४३८ व्यक्तींना लसीचा पहिला डोस, तर ६ हजार १०६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. प्रतिदिन २ हजार १६५ व्यक्तींचे लसीकरण केले जात असून, १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर चार हजार डोसची आवश्यकता भासणार आहे. मात्र, त्या तुलनेत लसीचा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला ब्रेक बसू शकतो.
१६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य, महूसल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पालिकेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लस टोचण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथम १० ते १५ दिवसांच्या अंतराने ६ हजार ते १० हजार लसीचा साठा आरोग्य विभागास प्राप्त होत आहे. त्यामुळे लसीकरणाची गतीही वाढली आहे. सध्या प्रतिदिन सरासरी २ हजार १६५ व्यक्तींना लस टोचली जात आहे. १ एप्रिलपासून आता ४५ वर्षांपुढील सर्वच व्यक्तींना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास चार लाख लसीचे डोस लागणार आहेत. आठवड्यास सरासरी ३६ हजार लसींचा पुरवठा होणे गरजचे आहे. सद्य:स्थितीत कोव्हिशिल्डच्या ५ हजार ८२० तर कोव्हॅक्सिनचे ९ हजार १५० डोस उपलब्ध आहेत. शासनाकडे आरोग्य विभागाने ३० हजार डोसची मागणी केलेली आहे. सध्या लसीचा साठा मुबलक असला तरी येत्या काळात ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाल्यानंतर मागणी एवढा पुरवठा न झालयास लसीकरण मोहिमेसला ब्रेक बसू शकतो.
१६ जानेवारी
जिल्ह्यात लसीकरण सुरू पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य सेवक ७९४५ ४२३२
फ्रंटलाईन वर्कर्स ७३१३ १८७४
ज्येष्ठ नागरिक २९९८
४५ वर्षांवरील १७१८२
सहव्याधी असलेले
४५ वर्षांपुढील दोन
लाख नागरिकांना करावे
लागणार लसीकरण
जिल्ह्याच्या एकूण लोखसंख्येच्या १३ टक्के नागरिक ४५ ते ५९ वयोगटांतील असून, त्यांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. या व्यक्तींना १ एप्रिलपासून ६१ केंद्रावरून लसीकरण केले जाणार आहे. या नागरिकांसाठी पहिला व दुसरा डोससाठी चार लाख लसीचे डोस लागणार आहेत.
सध्या मागणी किती
साठा मिळतो किती
जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने लसीचा पुरवठा होत आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार लसीची मागणी केली असता. तेवढीच लस प्राप्त झाली होती. त्यानंतर ९ हजार, ६ हजार, ७ हजार लसीचे डोस प्राप्त होऊ लागले आहेत. मागणी एवढीच लस मिळत असल्याने लसीकरणही सुरळीत होऊ लागले आहे. मात्र, येत्या काळात लसीकरणही वाढणार असल्याने ३० हजार लसीची मागणी केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत लस मिळेल असे, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोट...
आठवड्याला लागणार ३६ हजार डोस
सध्या प्रतिदिन २ हजार १६५ व्यक्तींना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील आठ खासगी ५३ सरकारी केंद्रावरून ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी आठवड्यास ३६ हजारांच्या जवळपास लसीचे डोस लागणार आहे. त्या आनुषंगाने लसीची मागणी केली आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी,
जिल्हा लसीकरण अधिकारी