शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांविषयी माझं मत कायम,पण..; प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 17:44 IST

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला

उस्मानाबाद/मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असून दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणाही केली. मात्र, आपली युती केवळ शिवसेनेसोबत असून महाविकास आघाडीचा संबंध नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्यामुळे या युतीच्या सुरुवातीला आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगली आहे. त्यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या युतीमधील तणावाची चर्चा रंगली आहे. तर, शरद पवारांबद्दलच्या विधानावर आजही आपण कायम असल्याचा पुनर्उच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपून वापरायला हवेत असा सल्ला दिला. त्यानंतर, राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं. सांभाळून बोला हे मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं असतं तर तो सल्ला मी मानला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच, शरद पवारांसंदर्भातील विधानावर मी आजही कायम असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. पण, इतिहास विसरण्यास मी तयार आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.  

शिवसेना आणि बहुजन वंचित आघाडीत सर्व काही एकत्र लढण्याचे ठरले असून  उद्धव ठाकरे महाविकाससाठी प्रयत्न करत असल्याने तो त्यांचा विषय आहे. त्यामुळेच, अद्याप काही गोष्टी जाहीर केल्या नसल्याचेही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या सल्याविषयी विचारले असता कोण संजय राऊत? असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राऊत यांना दुर्लक्षित केले. 

काय म्हणाले होते संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे", असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना देऊ केला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत