कारवाईसाठी दिला उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:50+5:302021-09-23T04:36:50+5:30

उमरगा : येथील नगरपरिषदेच्या झालेल्या विशेष लेखा परीक्षणात स्थानिक विकास निधीमध्ये आर्थिक गैरव्यवहार आढळून आला असून, त्यातील दोषी नगरसेवक ...

A hunger strike was called for action | कारवाईसाठी दिला उपोषणाचा इशारा

कारवाईसाठी दिला उपोषणाचा इशारा

उमरगा : येथील नगरपरिषदेच्या झालेल्या विशेष लेखा परीक्षणात स्थानिक विकास निधीमध्ये आर्थिक गैरव्यवहार आढळून आला असून, त्यातील दोषी नगरसेवक व इतरांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा पालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, उमरगा नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी व निलंबनाची कार्यवाही येत्या आठ ते दहा दिवसांत करावी, अन्यथा १ ऑक्टोबरपासून उमरगा नगरपरिषदेसमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. यावर तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, शहराध्यक्ष विशाल माने, मराठा सेवा संघाचे अनिल सगर, तालुका सचिव दादासाहेब बिराजदार, राहुल कांबळे, धीरज कांबळे, अमर जाधव, माधव कांबळे, बसवराज कोरे, माधव जाधव, बालाजी दळवी, ॲड.एस.पी. शेख, प्रकाश दुमने आदींच्या सह्या आहेत.

Web Title: A hunger strike was called for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.