शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:51 IST

डोळे दिपवणारी पूजा! शिवजयंतीला भवानी तलवार महापूजेचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला

तुळजापूर (धाराशिव): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी अत्यंत नेत्रदीपक आणि ऐतिहासिक 'भवानी तलवार अलंकार महापूजा' मांडण्यात आली. "जय भवानी, जय शिवाजी" आणि "आई राजा उदे उदे" या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, हजारो भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेतला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेत्रदीपक महापूजाशिवजयंतीनिमित्त पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. पंचामृत अभिषेक आणि दैनंदिन विधी संपन्न झाल्यानंतर महंत व भोपे पुजारी यांच्या हस्ते विशेष महापूजा मांडण्यात आली. या पूजेमध्ये देवीला भरजरी महावस्त्र आणि शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आले होते. विशेष आकर्षण म्हणजे, आई भवानी आपल्या दोन्ही हातात चांदीची तलवार धरून ती छत्रपती शिवरायांना प्रदान करत आहे आणि महाराज गुडघ्यावर टेकून नम्रपणे तिचा स्वीकार करत आहेत, असा हुबेहूब देखावा साकारण्यात आला होता. शेजारीच उभारलेली किल्ल्याची प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

इतिहास आणि श्रद्धाआई भवानीने महाराजांना दृष्टांत देऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी ही तलवार प्रसाद म्हणून दिली होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच तलवारीच्या बळावर महाराजांनी अनेक लढाया जिंकून स्वराज्याचे रक्षण केले. या ऐतिहासिक घटनेचे प्रतीक म्हणून दरवर्षी ही विशेष पूजा मांडली जाते.

दिवसभर भाविकांची मांदियाळीसकाळी भाविकांची संख्या काहीशी कमी असली तरी, अभिषेक सोहळा संपताच देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. दुपारपर्यंत संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने गणेश विहार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Jayanti Celebrated at Tuljapur; 'Bhavani Sword' Special Pooja

Web Summary : Tuljapur celebrated Shiv Jayanti with a special 'Bhavani Sword' Pooja at Tulja Bhavani temple. A captivating display depicted Shivaji receiving the sword, drawing thousands of devotees. The temple resonated with chants, honoring the historic event and Shivaji Maharaj's legacy.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजdharashivधाराशिव