शिवशक्ती विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:07+5:302021-09-16T04:40:07+5:30
अध्यक्षस्थानी ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य गोविंद देवणे, ज्ञान विकास ...

शिवशक्ती विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात
अध्यक्षस्थानी ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य गोविंद देवणे, ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे संचालक नरसिंग करके आदी उपस्थित होते. यावेळी दहावीतील मुलींनी राष्ट्रभाषा गौरव गीत सादर केले. या निमित्ताने भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिवानी सिरसे, अभिषेक जवळगे व भाग्यश्री गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. यावेळी हिंदीविषयी शिक्षक म्हाळाप्पा कोकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाषण स्पर्धेतील विजेत्यांना व इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे गोविंद देवणे यांनी विद्यार्थांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास विद्यालयातील विजया गायकवाड, धनराज पाटील, राजेंद्र सगर, वाकडे सिद्धेश्वर, महादेव करके, सोमनाथ म्हेत्रे, दत्तू कांबळे, मोहन दुधंबे, शिवाजी चेंडके आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी म्हाळाप्पा कोकरे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन अजित साळुंके यांनी केले, तर आभार म्हाळाप्पा कोकरे यांनी मानले.