उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ मंडलांना अतिवृष्टीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:44+5:302021-09-06T04:36:44+5:30
उस्मानाबाद : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्री जिल्ह्यातील जवळपास बारा मंडलांना अतिवृष्टीने तडाखा दिला. पावसासाेबतच वादळीवारे असल्याने ताेडणीसाठी आलेला ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ मंडलांना अतिवृष्टीचा तडाखा
उस्मानाबाद : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्री जिल्ह्यातील जवळपास बारा मंडलांना अतिवृष्टीने तडाखा दिला. पावसासाेबतच वादळीवारे असल्याने ताेडणीसाठी आलेला ऊस आडवा झाला, तर काढणीला आलेला व काढणी झालेल्या मूग पाण्याखाली गेला आहे. परंडा तालुक्यातील सर्व पाच, तर भूम तालुक्यातील पाचपैकी चार मंडलात अतिवृष्टी नाेंदविली गेली.
पावसाळ्याचे तीन महिने सरून गेले तरी वार्षिक सरासरीच्या ५० ते ५५ टक्के पाऊस पडला हाेता. त्यामुळे बहुतांश प्रकल्प माेठ्या पावसाच्या प्रतीक्षेत हाेते. आठ ते दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर चार ते पाच दिवसांचा खंड दिल्यानंतर शनिवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात जाेरदार पाऊस काेसळला. परंडा तालुक्यातील सर्वच पाचही मंडलात अतिवृष्टी नाेंदविली गेली. यामध्ये परंडा मंडलात १०७.३ मिलिमीटर, आसू ८४.५ मिमी., जवळा ९४.३, अनाळा ८५.५, साेनारी ९१.३ मिमी. पाऊस काेसळला. भूम तालुक्यातील अंबी १०२.८ मिमी., माणकेश्वर ११६.३ मिमी., भूम ९४.३, ईट ८१.५, तर वालवड मंडलात ६२.८ मिमी. पाऊस नाेंदविला गेला. वाशी तालुक्यातील पारगाव ७८.५ मिमी. तर तेरखेडा सर्कलमध्ये ६५.३ मिमी. पाऊस नाेंदविला गेला. तसेच तुळाजपूर तालुक्यातील मंगरूळ सर्कलमध्येही ७७.३ मिमी. पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस साेयाबीन पिकासाठी तसेच प्रकल्पांचा जलसाठा उंचावण्यासाठी उपयुक्त असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे माेडणारा ठरला आहे. वादळी वाऱ्यामुळे ऊस अक्षरश: आडवा झाला, तर काढणीला आलेला उडीद, मूग ही पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज शेतकरी बाेलून दाखवत आहेत.