५ मंडळात अतिवृष्टी, राज्यमार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST2021-09-25T04:35:38+5:302021-09-25T04:35:38+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रात्रभर पाऊस सुरूच होता. शुक्रवारी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ४५.७० ...

५ मंडळात अतिवृष्टी, राज्यमार्ग ठप्प
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रात्रभर पाऊस सुरूच होता. शुक्रवारी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ४५.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ६२.७० मि.मी. पाऊस हा उमरगा तालुक्यात नोंद झाला आहे. या पाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यात ५३, तुळजापूर व लोहारा तालुक्यात ५१, भूम ४५, कळंब ३९, परंडा २६ तर, वाशी तालुक्यात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात तेर, ढोकी, शिराढोण, उमरगा व मुळज या पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचले असनू, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्प हा पूर्णता भरल्याने त्याचे सहाही दरवाजे उघडून पुन्हा शुक्रवारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कळंब व ढोकीदरम्यान काम सुरू असलेल्या राज्यमार्गावरील एक पर्यायी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे. दरम्यान, वीज पडल्याने कळंब तालुक्यातील सातेफळ व डिकसळ येथे प्रत्येकी एक म्हैस जागीच मृत्युमुखी पडली आहे.