लोहारा, जेवळी, मुरूम परिसरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:49+5:302021-06-01T04:24:49+5:30

लोहारा शहरासह तालुक्यातील हिप्परगा रवा, नागराळ, बेडकाळ, मार्डी, कास्ती, लोहारा खुर्द, मोघा या गावासह परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पाणी ...

Heavy rain in Lohara, Jawali, Murum area | लोहारा, जेवळी, मुरूम परिसरात जोरदार पाऊस

लोहारा, जेवळी, मुरूम परिसरात जोरदार पाऊस

लोहारा शहरासह तालुक्यातील हिप्परगा रवा, नागराळ, बेडकाळ, मार्डी, कास्ती, लोहारा खुर्द, मोघा या गावासह परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पाणी आले होते. तसेच शहरासह हिप्परगा रवा येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले. जेवळी व परिसरातील रूद्रवाडी, दक्षिण जेवळी, भोसगा, आष्टाकासार, दस्तापूर, कोळणूर, पांढरी परिसरातही वादळी वारा आणि मेघगर्जनेसह एक तास दमदार पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील जळकोट व परिसरातील हंगरगा, बोरगाव, सिंदगाव, जळकोट वाडी,मुर्टा परिसरात एक तास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतशिवारातून पाणी वाहू लागले. मुरुम शहर व परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह अर्धातास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. बलसूरसह परिसरातील कडदोरा व्हंताळ, कलदेव निंबाळा रामपूर. समुद्राळ परिसरातही दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. येणेगूरसह सुपतगाव, नळवाडी शिवारात सायंकाळी अवकाळी पावसाने तासभर चांगलीच हजेरी लावली.

Web Title: Heavy rain in Lohara, Jawali, Murum area