आरोग्य कर्मचाऱ्याचा पिंपळा येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:29+5:302021-09-11T04:33:29+5:30
तामलवाडी : कोरोना काळात डॉक्टर व आरोग्य सेवा अधिकारी, कर्मचारी यांनी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बुद्रुक गावास दिलेल्या ...

आरोग्य कर्मचाऱ्याचा पिंपळा येथे सत्कार
तामलवाडी : कोरोना काळात डॉक्टर व आरोग्य सेवा अधिकारी, कर्मचारी यांनी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बुद्रुक गावास दिलेल्या सेवेबद्दल गावकऱ्यांच्या वतीने गुरुवारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, ग्रा. पं. सदस्य संग्रामसिंह राजेपांढरे, सरपंच गीता वाघमोडे, पोलीस पाटील महादेव नरवडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सामाजिक संकटकाळात डॉक्टर्स, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे योगदान खूप मोठे आहे. रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा दिली. नागरिकांना धीर देणे, त्यांचे मनोबल उंचावणे, लसीकरणासाठी प्रबोधन करून प्रवृत्त करण्याचे काम त्यांनी केल्याचे मान्यवरांनी यावेळी भाषणातून सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र पुंडे, यशवंत कदम, जनार्दन गोप, बी. एम. शिंदे, आशा पाटील, गोरे, सुनंदा मस्के, अनिता धोतरकर या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला झाला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल नरवडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महादेव नरवडे, बालाजी चौगुले, परवेज शेख, संग्राम राजेपांढरे, आकाश चौगुले, नागनाथ नरवडे, नागनाथ जाधव, सुधाकर वाघमोडे, अरविंद पाटील, संजय डोलारे यांनी पुढाकार घेतला.