‘उसे तो बस इन्सानों मे इन्सान दिखता था’
By Admin | Updated: July 29, 2015 00:47 IST2015-07-29T00:44:29+5:302015-07-29T00:47:40+5:30
उस्मानाबाद : अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे, भारतीय धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतिक

‘उसे तो बस इन्सानों मे इन्सान दिखता था’
उस्मानाबाद : अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे, भारतीय धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतिक माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाले. देशवासियांत अत्यंत लोकप्रिय असलेल्या कलाम यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. आपल्या या आवडत्या व्यक्तिमत्वास अनेकांनी आपल्या शब्दफुलांव्दारे श्रद्धांजली वाहिली. मंगळवारी दिवसभर वॉटस्अप , फेसबुक तसेच इतर सोशल माध्यमावर डॉ. कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या तसेच त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्टचा पाऊस पडला होता.
डॉ. अब्दुल कलाम यांचा सर्वस्तरातील वर्ग चाहता होता. अगदी शाळकरी विद्यार्थ्यांपासून जेष्ठ मंडळींनाही कलाम यांनी आयुष्यभरात केलेल्या उतुंग कामांचा नेहमीच आदर राहिलेला आहे. त्यातच कलाम यांचे व्यक्तिमत्व सर्वसामान्यांना भावणारे असल्याने त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्याचाच प्रत्येय मंगळवारी सोशल मिडियावर येत होता.
जिन्होने अपने जीवन
की शुरुवात,
लोंगो के घर
अखबार डालकरकी थी...
आज उन्ही की खबर,
दुनिया के हर अखबार मे है ।
मंगळवारी सर्वच वर्तमानपत्रात कलाम यांच्या निधनाचे वृत्त झळकल्यानंतर कलाम यांनी आयुष्याच्या प्रारंभी सोसलेल्या यातनांचीही अनेकांना आठवण झाली. अत्यंत कष्टातून कलाम यांनी आपले आयुष्य घडविले होते. भारताला परमाणू क्षेत्रात स्वबळ निर्माण करुन देणाऱ्या कलाम यांच्या सर्वधर्मियांच्या प्रथा-परंपरांचा आदर करण्याच्या स्वभावाचीही अनेकांना आज प्रकर्षाने आठवण झाली. त्यामुळे
जो देता था एकता का पैगाम,
वह कलाम चला गया..
जिसने दिया देश को परमाणू सलाम, ओ कलाम चला गया...
अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कलाम म्हणजे सर्वधर्मसमभावाचे मूर्तीमंत उदाहरण होते. भारतीय हीच ओळख त्यांची कायम होती. या त्यांच्या गुणांचीही मंगळवारी श्रध्दांजली वाहताना अनेकांना आठवण आली.
ना हिंदू दिखता था,
ना मुसलमान दिखता था
उसे तो बस इन्सानों मे,
इन्सान दिखता था
हो गई आज खामोश,
वो आवाज सदा के लिए
जिसकी बातो में केवल,
हिंदुस्थान दिखता था ।
इन्सानों मे इन्सान बघणाऱ्या कलांमाना आदरांजली वाहताना त्यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज आहे. कलाम यांनी संशोधनासह इतर विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करुन भारतीयांसमोर मोठा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळेच कलाम यांच्या निधनानंतर अनेकांनी
कुदरत भी फुट फुट के रोया है..
आज देशने कलाम खोया है ।
लगा सका न कोई उसके
कद का अंदाजा..
वह आसमा था मगर
सर झुकाये हुआ था ।।
अशा शब्दात आदरांजली वाहिली. कलाम यांनी देशाची प्रचंड सेवा केली. शास्त्रज्ञ ते भारताचे राष्ट्रपती असा मोठा यशाचा पल्ला त्यांनी गाठला. मात्र त्यानंतरही त्यांनी साधेपणा जपला. या त्यांच्या स्वभावाची अनेकांना भूरळ होती. त्यामुळेच ‘वह आसमा था.. मगर सर झुकाये हुआ था’ अशा शब्दात त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची मांडणी केली.
‘आओ झुक कर सलाम करे उन्हे
जिनके हिस्से में मुकाम आया है ।
खुश नशिब होता है ओ लहु
जो देश के काम आया है ।।
काहींनी अशा शब्दात
तर काहींनी
वो ‘कलाम’ नही कमाल थे..
मिसाईलमॅन वो बेमिसाल थे ।
उनकी खुबिया करती रहेगी,
पथप्रदर्शन मेरा
वो मेरी मातृभूमी की ढाल थे ।
अशा पध्दतीने कलाम यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. सोशल मिडीयावर हिंदीसह इतर भाषेतून कलाम यांच्या आठवणींसह त्यांनी देशासाठी दिलेल्या योगादानाची माहिती देण्यात येत होती. यात मराठीतून येत असलेल्या संदेशांची संख्याही लक्षवेधी होती.
नभ पंखात दडला तारा चमचमता अंगार उरी विजला
निखारा लखलखता,
दिले प्रकाश ज्याने
जगतास आयुष्यभर
निस्वार्थ केली सेवा
मी पणा मुळी नव्हता,
ते अग्निपंख तुटले
सारा देश व्याकुळला
आज तुमच्या जाण्याने
सारा भारत रडला.
तर काहींनी
देशासाठी महान योगदान
ना सोडले कधी ज्ञानदान
जगात भरुन त्यांंची किर्ती
संयमी सफल होते राष्ट्रपती
चटका लावून गेले मनास, ना होणे कोणी डॉक्टर कलाम
कर्तृत्वास त्यांच्या माझा सलाम..!
अशा शब्दात कलाम यांना श्रध्दांजली अर्पण केली. कलाम यांनी एवढ्या मोठ्या पदावर जावूनही साधेपणा जपला होता. त्यांच्या अंतिम काळातही त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाशी असलेली आपली नाळ आजही तुटलेली नसल्याचेच एका सैनिकाशी संवास साधून दाखवून दिले होते. माणसा-माणसाला जोडणाऱ्या या आपल्या माजी राष्ट्रपतीकडून आपण एवढा एक गुण घेतला तरी समाजात मोठा बदल होवू शकतो. हे सांगण्यासाठी एकाने ‘तू माणसात आहे, रे जोड माणसानां’ असा संदेश या शब्द सुमनांच्या माध्यमातून दिला आहे.
‘सोडून जात आहे
मी धर्म माणसांना
सांगेल कबर माझी
हे कर्म माणसांना
तु माणसात आहे,
रे जोड माणसाना..!