पत्नीमुळे त्रास, पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:47+5:302021-09-02T05:09:47+5:30
नळी येथील प्रभू विठ्ठल शिंदे यांची पत्नी माहेरकडील लोकांच्या उकसविण्यावरून आपल्या दोन मुलींसह माहेरीच राहत होती. यातूनच प्रभू यांच्या ...

पत्नीमुळे त्रास, पतीची आत्महत्या
नळी येथील प्रभू विठ्ठल शिंदे यांची पत्नी माहेरकडील लोकांच्या उकसविण्यावरून आपल्या दोन मुलींसह माहेरीच राहत होती. यातूनच प्रभू यांच्या सासरकडील रामभाऊ, दत्तू, नवनाथ किसन हराळ या तिघा भावांसह शीतल, युवराज, नाना, अंबादास हराळ, तसेच सामनगाव येथील गोरख खटके या आठ जणांनी मिळून २९ ऑगस्ट रोजी प्रभू शिंदे यांना रामभाऊ हराळ यांच्या घरात कोंडले होते, नंतर या सर्वांनी त्यांना जबर मारहाण केली. असे अपमानास्पद प्रकार सातत्याने होत असल्याने प्रभू शिंदे हे वैतागून गेले होते. २९ रोजी झालेल्या मारहाणीनंतर त्यांनी टोकाचा निर्णय घेत, सायंकाळी नळी शिवारातील शेतात आत्महत्या केली. यानंतर, उपरोक्त आठ जणांनी प्रभू शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मयताचे भाऊ सुनील शिंदे यांनी सोमवारी आंबी ठाण्यात दिली. त्यानुसार, आरोपींवर कलम ३०६, ३४ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.