पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघे कंबरदुखी मागे लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST2021-09-24T04:39:01+5:302021-09-24T04:39:01+5:30
प्रत्येक व्यक्ती हा आपल्या दिनचर्येत व्यस्त असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची विशिष्ट अशी दैनंदिनी असते. कोणी कामावर जात ...

पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघे कंबरदुखी मागे लागली
प्रत्येक व्यक्ती हा आपल्या दिनचर्येत व्यस्त असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची विशिष्ट अशी दैनंदिनी असते. कोणी कामावर जात चाकरी बजावतो तर कोणी भाकरीसाठी राबराब राबतो. याशिवाय खरेदी, दवाखाना अशासाठी बाहेर पडावे लागते. प्रत्येक व्यक्तिला असा ''उंबरठा'' ओलांडावा लागत असला तरी पहिल्यासारखी ''पायपीट'' मात्र करावी लागत नाही. कारण, काळ बदलला आहे. या बदलत्या काळात दळणवळणाच्या सोयी-सुविधांचा विकास होत दुचाकी ते चारचाकी अशी साधनं हाती आल्याने पायी चालणे कमी झाले आहे. एकीकडे ही सुखद स्थिती असली तरी दुसरीकडे यामुळे शारीरिक व्यायाम कमी झाल्याने विविध व्याधी मात्र उत्पन्न होत आहेत. चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम असतो अन् नेमका यातच खंड पडत असल्याने अनेक आजार डोके वर काढत आहेत.
चौकट...
या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ -एखादा गावातून फेरफटका होतो, व्यायाम म्हणून नाही
महिला - घरातील या रूममधून त्या रूममध्ये, जास्तीत जास्त अंगणात
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत
तरूणाई - मित्र भेटतील अशा चौकात किंवा खरेदीसाठी
बॉक्स १
म्हणून वाढले हाडांचे आजार
चौकट...
हे करून पाहा (पॉईंटर्स)
किमान एक, दोन कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा
कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या
वाहनांचा वापर कमी करून पायी चालत कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला
बॉक्स २
ज्यांना पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...
ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी घरातल्या घरात व्यायाम करावा. जागेवरच दोरीवरच्या उड्या, वॉकिंग असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर आहेत. पी. टी. एक्झरसाईजही करता येईल. इनडोअर जीमच्या माध्यमातून कसरत करता येईल.
डॉ. अजीत देशमुख
अस्थिरोग तज्ज्ञ. कळंब.