३३ लाख ७४ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:19+5:302021-01-23T04:33:19+5:30

उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन सातत्याने महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखुची तस्करी होत असते. सीमेलगतच्या कर्नाटकातून तसेच तेलंगणातूनही ...

Gutka worth Rs 33 lakh 74 thousand seized | ३३ लाख ७४ हजारांचा गुटखा जप्त

३३ लाख ७४ हजारांचा गुटखा जप्त

उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन सातत्याने महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखुची तस्करी होत असते. सीमेलगतच्या कर्नाटकातून तसेच तेलंगणातूनही हा माल महाराष्ट्रात आणला जातो. दरम्यान, उमरगा पोलीस महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना बुधवारी रात्री त्यांना एक टेम्पो (क्र. एम.एच. १२ आरएन ६१०६) संशयास्पद आढळून आला. तेव्हा त्यांनी टेंपोची झडती घेतली असता त्यात ३५ पोती भरुन गुटखा आढळून आला. या मुद्देमालाची दिवसभर मोजदाद केली असता ती ३२ लाख ७४ हजार रुपये इतकी भरली. शिवाय, १ लाख रुपये किंमतीचा टेंपो असा एकूण ३३ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल उमरगा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा अधिका-यांनी तपासणी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी वाहन चालक नवनाथ सुभाष बारसे (रा. कुरुंदा, जि. हिंगोली) या आरोपीस ताब्यात घेतले आहे. हा गुटखा कुठे व कोणी मागविला याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी दिली.

Web Title: Gutka worth Rs 33 lakh 74 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.