शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भव्य ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास थाटात प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:17 AM

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारी मोठ्या थाटात भव्य-दिव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेने प्रारंभ झाला.

प्रवीण खापरे संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : येथील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारी मोठ्या थाटात भव्य-दिव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेने प्रारंभ झाला. प्रारंभी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व ९२ अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले.उस्मानाबाद शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर सकाळी आठ वाजल्यापासून शहरासह परिसरातील शाळा, विद्यालयाचे विद्यार्थी विविध विशेभूषेत दाखल होत होते. येथूनच शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार असल्याने या ठिकाणी साहित्यिकांसह रसिकांनीही गर्दी केली होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. खास संमेलनासाठी तयार केलेल्या ‘शीर्षक गीता’च्या स्वरात स्वर मिसळत स्थानिक नागरिक, शाळकरी मुले, विविध धार्मिक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते ग्रंथदिंडीत सहभागी झाले. दिंडीच्या अग्रभागी ग्रंथपालखी आणि त्यापाठोपाठ साहित्याचे भोई म्हणून विख्यात साहित्यिक, रसिक होते. दरम्यान, ग्रंथदिंडी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे संमेलनस्थळी दाखल झाली. त्यानंतर ध्वजारोहण झाले.>महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभागक्रीडा संकुलातून दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले चौक, समताचौक मार्गे टीव्ही सेंटर चौकात दाखल झाली. ढोल-ताशे, स्थानिक वाद्य परंपरा सांभाळणारे घोषवादक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत गोरा कुंभार आदी महापुरूषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन