शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:59 IST

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातून मदत

- बालाजी आडसूळ कळंब (उस्मानाबाद ) : बिकट आर्थिक स्थितीमुळे मेडिकल प्रवेश अंधातरी बनलेल्या गोरख मुंडे या होतकरू विद्यार्थ्याची ‘अडथळ्याची शर्यत’ लोकमतने प्रकर्षाने मांडल्यानंतर राज्याच्या कानाकोपºयातून गोरखला मदतीचा ओघ सुरू झाला होता. यातूनच आता गोरखचा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश ‘निश्चित’ झाला. त्यामुळे आता संघर्षयात्रीचे ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

कळंब तालुक्यातील भोगजी या दुष्काळी गावातील अत्यंत नाजूक आर्थिक स्थिती असलेल्या तुकाराम मुंडे यांना केवळ बारा गुंठे कोरडवाहू जमीन. यास्थितीत मजुरी करून ते आपल्या दोन मुलांना शिकवित आहेत. यातील गोरख या आईविना पोरक्या असलेल्या होतकरू विद्यार्थ्याने कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात शिक्षण घेत वैद्यकीय शिक्षणातील ‘नीट’ या प्रवेश पात्रता परिक्षेत ५०५ गुण घेतले. वाढत्या स्पर्धेत त्याचा सोलापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु, खायचे अन् तालुक्याला ‘फॉर्म’ भरायला जायचे वांदे असलेल्या गोरखपुढे मेडिकल प्रवेशासाठी लागणारे साडेचार लाख रुपये कोठून आणायचे? असा प्रश्न पडला. यास्थितीत त्यांनी आपल्या प्रवेशाचा विचार सोडून दिल्यात जमा होता.

गोरखचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले जात होते. नेमक्या याच वेळी ‘लोकमत’ने आर्थिक स्थितीमुळे होतकरू व गुणवंत गोरखचा प्रवेश अंधातरी झाल्याचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध करून समाजमनाला साद घातली होती. या वृत्ताची संबंंध राज्यभरात दखल घेतली गेली. दिवसभर अनेक लोक गोरखशी संपर्क करत होते. समाजातील अनेक दानशुरांचे मदतीसाठी हात पुढे सरसावले. फुल ना फुलाच्या पाकळी स्वरूपात आर्थिक मदत जमा होवू लागली. कोणी थेट भेटीअंती तर कोणी बँक खात्यात मदत जमा केली. यासाठी त्याच्या प्रवेशासाठी तन, मन, धनाने झटणारी जिल्हा परिषद शाळेतील राजेंद्र बिक्कड व महादेव खराटे ही जोडी अहोरात्र लोकांच्या संपर्कात होती. अखेर जमा झालेली रक्कम व शब्द दिलेल्या रक्कमेच्या आधारावर हातउसने केलेल्या पैशावर गोरखचा सोलापूर येथील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजमध्ये  ‘एमबीबीएस’साठी प्रवेश ‘कन्फर्म’ झाला आहे.

मदतीसाठी सरसावले हात...गोरखची व्यथा लोकमतमधून प्रसिद्ध होताच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी १ लाख ५१ हजाराची मदत जाहीर केली होती. रविवारी सकाळी परळी येथील गोपीनाथ गडावर या रक्कमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे ही मदत देण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. भारत खराटे यांनीही सर्वतोपरी अशी मोठी मदत केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर यांनी तसेच भाजपा नेते  डॉ. प्रतापसिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांनीही प्रत्येकी २५ हजाराची मदत दिली. कळंब येथील मोहेकर महाविद्यालयाने ५० हजाराची मदत दिली आहे. याशिवाय थेट खात्यावर राज्यातील कानाकोप-यातून यथाशक्ती मदत आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कळंब येथील बालरोगतज्ञ डॉ. रमेश जाधवर गोरखच्या शैक्षणिक काळात इतर खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये देणार आहेत.

माझा अनिश्चित असलेला मेडिकल प्रवेश आता निश्चित झाला आहे. याचा मला खूप मोठा आनंद आहे. ‘लोकमत’ने माझी व्यथा मांडली नसतील तर मला हा पल्ला गाठता आला नसता. त्यांच्यामुळेच माझ्या मदतीसाठी राज्यभरातून अनेकांचे हात पुढे आले. त्यामुळे ‘लोकमत’चे मी आभार मानतो. सोबतच सर्व मदतगारांचेही ऋण व्यक्त करतो. -गोरख मुंडे, विद्यार्थी. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयSocialसामाजिकStudentविद्यार्थीOsmanabadउस्मानाबाद