लॉकडाऊनच्या निर्बंधात शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:16+5:302021-07-04T04:22:16+5:30
बॉक्स...१ आगामी शुभमुहूर्त... दिवाळीतील तुळशी विवाह व उन्हाळ्यातील अक्षय्य तृतीयेनंतर विवाहास गती येते. चैत्र, वैशाखात अधिक संख्येने सोहळे पार ...

लॉकडाऊनच्या निर्बंधात शुभमंगल सावधान!
बॉक्स...१
आगामी शुभमुहूर्त...
दिवाळीतील तुळशी विवाह व उन्हाळ्यातील अक्षय्य तृतीयेनंतर विवाहास गती येते. चैत्र, वैशाखात अधिक संख्येने सोहळे पार पडतात. यंदा मात्र एप्रिल महिन्यात ७ विवाह तिथी, १६ मुहूर्त, तर मे महिन्यात १७ तिथी व ४० विवाह मुहूर्त असतानाही दुसऱ्या लाटेने कार्य पार पडली नाहीत. यात पंचांगानुसार जुलैमध्ये ‘तेरा सात’ ही मुख्य लग्नतिथी असून पुढे जुलै महिन्यात सहा व ऑगस्ट महिन्यात आठ तिथी आहेत. परंतु त्या ‘अडचण प्रसंगात’ मोडतात.
बॉक्स १
या अटींचे पालन बंधनकारक...
२५ जून रोजी जिल्हाधिकारी यांनी नवीन निर्देश दिले आहेत. यात विवाह समारंभासाठी केवळ पन्नास व्यक्तींना अनुमती राहणार आहे, असे नमूद केले आहे. २८ जूनपासून पुढे हे आदेश लागू झाले आहेत. याशिवाय कोविड संदर्भातील सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर यांच्या अवलंबाची काळजी घ्यावीच लागणार आहे.
बॉक्स ३
पन्नास लोकांच्या उपस्थितीतच...
नव्या निर्देशात विवाह सोहळ्यास अनुमती कोणाची घ्यावी, असे नमूद नसले तरी शहरात नगर परिषद प्रशासन व ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांना अवगत केले जात आहे. याशिवाय काही लोक पोलीस ठाण्यास यासंबंधी कळवत आहेत. यासंदर्भात काही ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता पन्नास माणसांच्या मर्यादेत विवाह करता येतो, त्यासाठी आमच्याकडे अर्ज येत नाहीत असे सांगितले. तर पोलिसांनी आमच्याकडे ग्रापंकडे दिलेला अर्ज माहितीस्तव येतो, असे सांगितले.
प्रतिक्रिया...