गोंधळवाडीतील निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:04+5:302021-02-09T04:35:04+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भगवान मोटे तर उपसरपंचपदी गोपाळ मोटे यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय ...

Gondhalwadi selection unopposed | गोंधळवाडीतील निवडी बिनविरोध

गोंधळवाडीतील निवडी बिनविरोध

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भगवान मोटे तर उपसरपंचपदी गोपाळ मोटे यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून डी.एम. सावंत यांनी काम पाहिले. बैठकीस भैय्या पारसे, कालिंदा माने, सविता मोटे, रुक्मिणीबाई मोटे, कल्पना मोटे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अमृत मोटे, विष्णू मोटे, गुलचंद माने, नागनाथ माने, विठ्ठल मोटे, संभाजी रेड्डी, रामलिंग मोटे, अजित मोटे, लक्ष्मण मोटे, ग्रामसेविका बी.व्ही. देवकते आदी उपस्थित होते.

------------

सूरतगावच्या सरपंचपदी भाजपाच्या द्रौपदीबाई गुंड

(फोटो : संतोष मगर ०८)

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या द्रौपदीबाई प्रकाश गुंड तर उपसरपंचपदी बाबासाहेब बब्रुवान गुंड यांची सोमवारी निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

सोमवारी निवडणूक अधिकारी व्ही.एल. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला.

सरपंचपदासाठी द्रौपदीबाई गुंड यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली, तर उपसरपंचपदासाठी बाबासाहेब गुंड व प्रल्हाद गुंड या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गोपनीय पद्धतीने मतदान प्रक्रिया होऊन यात बाबासाहेब गुंड हे विजयी ठरले. यावेळी मेघा गुंड, पद्मिनी गुंड, भामाबाई देवकर, राजेंद्र सुरते, दादा घोडके, लक्ष्मी घोडके, प्रल्हाद गुंड हे सदस्य उपस्थित होते.

निवड जाहीर होताच, समर्थकांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करून आंनदोत्सव साजरा केला. यावेळी बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, कृष्णा रोचकरी, आण्णासाहेब गुंड, प्रमोद गुंड, नवनाथ सुरते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गुंड, राम गुंड, नेताजी मुळे, ज्ञानेश्वर गुंड, पांडुरंग गुंड, आबा गुंड, हरी गुंड, हरी पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Gondhalwadi selection unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.