शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 20:10 IST

मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली.

उस्मानाबाद - साखरपुडा करायला गेले अन् लग्नच उरकून आले, अशी बातमी आपण वाचली आहे. मात्र, मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली. महेश केशव गायकवाड असे शेतकरी कुटुंबातील नवरदेवाचे नाव आहे. तर विशाखा संभाजी शिंदे असे वधु मुलीचे नाव आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे लग्नाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या या उपक्रमाचे गावपातळीवर कौतूक होत आहे.

सोलापूरच्या पाथरी येथील महेश केशव गायकवाड हे आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी वाशी तालुक्यातील गोलेगाव येथे गेले होते. साधारण दुपारी दोन वाजता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाची चर्चा सुरु होती. मात्र, मुलाचे भाऊजी बालाजी चौधरी आणि राजाभाऊ बाराते यांनी पुढाकार घेत दुष्काळी परिस्थितीचा दाखला घेत लगेच लग्न करण्याचा विचार मांडला. त्यास, मुलाचे वडिलबंधू रमेश गायकवाड, न्या. दिनेश गायकवाड आणि अमोल गायकवाड यांनी सहमती देताच लग्न करण्याचं ठरलं. त्यानंतर, दिवाळीच्या पाडव्यादिवशीच गुरुवारी सायंकाळी लग्नासोहळा पार पडला.

बी कॉम पदवीधर शिक्षण घेतलेल्या विशाखानेही व्यवसायाने शेतकरी असलेल्या महेशसोबत संसार करण्याचा होकारार्थी निर्णय एका क्षणात कळवला. त्यानंतर, लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मुलगी अन् नारळ या परंपरेनुसार लग्न सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात पडला. या लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजकीच वऱ्हाडी मंडळी हजर होती. 

शेतकरी मुलाला पसंती शेतकरी कुटुंबातील महेश हा पदवीधर असून वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करतो. विशेष म्हणजे महेशच्या कुटुंबातील दोन्ही वडिलबंधू उच्च शिक्षित असून रमेश गायकवाड हे प्राध्यापक आहेत. तर दिनेश गायकवाड हे न्यायमूर्ती आहेत. तरीही, कुठलाही बडेजाव न करता, किंवा मोठेपणाचा कुठलाही आव न आणता साधारणपणे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीधर असलेल्या विशाखानेही तात्काळ लग्नाला होकार देत शेतकरी महेशला आपला आयुष्यभराचा साथीदार निवडले. इंजिनिअरच मुलगा हवा असा अट्टाहस करणाऱ्या मुलींपुढे पदवीधर विशाखाने एक आदर्श घालून दिला आहे.  

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्यमुलीकडील सर्वसाधारण परिस्थितीचा अंदाज घेत गायकवाड कुटुंबीयांनी लग्नातील खर्चाला फाटा देण्याचे ठरवलं. तसेच, ना घोडा, ना बँड, ना नेते ना प्रतिष्ठित व्यक्तींची रांग, केवळ हजर असलेल्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लग्नासाठी अनावश्यक खर्च करुन दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागू नये, यासाठी हा निर्णय एकमताने घेतला. विशेष म्हणजे यास नवरा आणि नवरीने पसंती दिल्यानेच हे शक्य झाल्याचे, गायकवाड कुटुबीयांनी म्हटले. 

टॅग्स :marriageलग्नOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी