गणेश भक्तांनी केले साठवण तलावातील पाण्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:18+5:302021-09-14T04:38:18+5:30

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शिवाजी तरुण मंडळ हे वर्गणीविना गणेश उत्सव साजरा करतानाच सामाजिक उपक्रमालादेखील प्राधान्य देत ...

Ganesha devotees worship the water in the storage lake | गणेश भक्तांनी केले साठवण तलावातील पाण्याचे पूजन

गणेश भक्तांनी केले साठवण तलावातील पाण्याचे पूजन

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शिवाजी तरुण मंडळ हे वर्गणीविना गणेश उत्सव साजरा करतानाच सामाजिक उपक्रमालादेखील प्राधान्य देत आहेत. गावाच्या उशाला असणाऱ्या सांगवी-मांळुब्रा साठवण तलावात यंदा पावसात ९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. या तलावावर तीन गावच्या शेती सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे. सलग तीन वर्षांपासून हा तलाव पाण्याने तुडुंब भरत आहे. त्यामुळे सोमवारी शिवाजी तरुण मंडळाच्या गणेश भक्तांनी तलावात जमा झालेल्या पाण्याचे पूजन करून पाणी बचतीचा संदेश दिला. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत कुलकर्णी, महेश पाटील, अध्यक्ष उमेश रोकडे, उपाध्यक्ष विष्णू मगर, सचिव रामदास मगर, सतीश शेळके, विशाल मगर, दादा रोकडे, महेश मगर, गोपाळ शिंदे, सौदागर मगर, नवनाथ मगर, प्रशांत मगर, आप्पा सुरते, बप्पा मगर आदी गणेशभक्त उपस्थित होते.

Web Title: Ganesha devotees worship the water in the storage lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.