कोरोनाच्या काळातील योगदानाबाद्दल गणेश मंडळाकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:22+5:302021-09-16T04:40:22+5:30

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील शिव मित्र गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून कोरोनाच्या ...

Ganesh Mandal felicitates for his contribution during the Corona period | कोरोनाच्या काळातील योगदानाबाद्दल गणेश मंडळाकडून सत्कार

कोरोनाच्या काळातील योगदानाबाद्दल गणेश मंडळाकडून सत्कार

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील शिव मित्र गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून कोरोनाच्या काळात योगदान दिलेल्यांना ‘कोरोना योद्धा’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा १४ सप्टेंबरला पार पडला.

कार्यक्रमास तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार तांदळे यांच्या हस्ते शिव मित्र गणेश मंडळाच्या श्रींची पूजा केल्यानंतर खंडोबा मंदिर सभागृहात कोरोना योद्धयांसह विविध सामाजिक क्षेत्रात काम केलेल्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी हॅलो फाऊंडेशनचे बसवराज नरे, लोकसेवा फाऊंडेशनचे पंकज शहाणे, सरपंच पद्मिनी सगट, उपसरपंच उत्तम देवकते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब देवकते, वानेगाव येथील माजी सरपंच उत्तम पाटील, शिव मित्र गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रताप पाटील, उद्योजक दीपक जाधव, गावातील शेतकरी सुभाष राजमाने यांच्यासह मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसाद राजमाने यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी सरपंच नागेश कालेकर यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान

यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज नरे, जलदूत तथा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे, पत्रकार राम जळकोटे, प्रतीक भोसले, वडगाव देव येथील आशा कार्यकर्ती शामल शिंदे, अंगणवाडी शिक्षिका बाई गिरी, विजया बनचेडे, अंगणवाडी सेविका रंजना बंडगर, जनाबाई बोरगावे, वडगाव देव ग्रामपंचायत सेवक म्हताब शेख, जिल्हा परिषद वडगाव येथील शिक्षक घायाळ, आदींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात देण्यात आले.

150921\img-20210915-wa0015.jpg

कोरोना योद्धा पुरस्कार देताना तहसीलदार सौदागर तांदळे,नायब तहसीलदार संदीप जाधव सह आदी उपस्थित होते.

Web Title: Ganesh Mandal felicitates for his contribution during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.