स्मशानभूमीच्या वादात अंत्यसंस्कार रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST2021-09-09T04:40:05+5:302021-09-09T04:40:05+5:30
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे गावालगत असलेल्या स्मशानभूमीचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने दुसऱ्या स्मशानभूमीसाठी जागा देऊन वैकुंठधाम बांधून ...

स्मशानभूमीच्या वादात अंत्यसंस्कार रखडले
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे गावालगत असलेल्या स्मशानभूमीचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने दुसऱ्या स्मशानभूमीसाठी जागा देऊन वैकुंठधाम बांधून दिले आहे. दरम्यान, बुधवारी गावातील सुंदराबाई नागप्पा दुधभाते (वय ७०) यांचे बुधवारी वार्धक्याने निधन झाले. यानंतर मयताच्या नातेवाइकांनी नवीन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार न करता जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सरपण टाकले. यावरून शेतकऱ्यांसोबत भांडण होऊन हाणामारी झाली. तरीही नातेवाइकांनी जुन्या स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सौदागर तांदळे व येथील सपोनी जगदीश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस व शिघ्रकृतीदलाची तुकडी तैनात केली. यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते.
दरम्यान, तहसीलदार व पोलिसांनी शेतकऱ्याची समजूत घालून जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडल्याने पंधरा तासानंतर रात्री ८ वाजता पोलीस बंदोबस्तात व महसूल प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.