चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:54+5:302020-12-29T04:30:54+5:30

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील दाळींब येथील राष्ट्रीय महामार्गालगत महंमद बाबू शेख यांचे मुस्कान कन्स्ट्रक्शनचे ...

The foursome continues unabated | चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच

चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील दाळींब येथील राष्ट्रीय महामार्गालगत महंमद बाबू शेख यांचे मुस्कान कन्स्ट्रक्शनचे कार्यालय आहे. हे कार्यालयाच्या शटरचे लाॅक ताेडून अज्ञाताने आतील लॅपटाॅप तसेच तीन एटीएम कार्ड लंपास केले. हा प्रकार समाेर आल्यानंतर शेख यांनी मुरूम पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून २७ डिसेंबर राेजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरी घटना उस्मानाबाद तालुक्यातील अंबेहाेळ येथे घडली. जिजाबाई पार्थसारथी पाटील या आपल्या घरात झाेपल्या हाेत्या. २८ डिसेंबरच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास अज्ञाताने घराच्या दरवाजाच्या आतील बाजुची कडी काढली. यानंतर घरातील साेन्याचे १५ ग्रॅम वजनाचे दागिने, ८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व राेख ५०० रूपये लंपास केले. ही घटना सकाळी उघडकीस येताच जिजाबाई पाटील यांचे पती पार्थसारथी पाटील यांनी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध भादंसंचे कलम४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

चाैकट...

घरातून माेबाईल लंपास

कळंब तालुक्यातील दहीफळ येथील अमाेल गुणवंत गायकवाड हे आपल्या घरात माेबाईल चार्जिंगला लावून झाेपले हाेते. हीच संधी साधत अज्ञाताने माेबाईल लंपास केला. ही घटना दुसर्या दिवशी समाेर आली. यानंतर गायकवाड यांनी येरमाळा पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: The foursome continues unabated