मुलाला राखी बांधली म्हणून नातेवाईक महिलांनी तरुणीची बेलण्याने केली धुलाई
By चेतनकुमार धनुरे | Updated: September 1, 2023 15:25 IST2023-09-01T15:24:30+5:302023-09-01T15:25:35+5:30
तरुणीने गल्लीतील एका मुलास राखी बांधल्याने झाला वाद

मुलाला राखी बांधली म्हणून नातेवाईक महिलांनी तरुणीची बेलण्याने केली धुलाई
धाराशिव : तुळजापूर शहरातील एका तरुणीने गल्लीतील तरुणाला राखी बांधल्याने त्याच्या महिला नातेवाईकांनी तरुणीला घरात घुसून बेलण्याणे मारहाण केली. तसेच टिव्ही, काचेची तोडफोड केल्याचीही घटना घडली आहे.
तुळजापूर शहराच्या पापनाश भागात राहणारी ममता वैभव शिंदे (२३) या तरुणीने गल्लीतच राहणाऱ्या आदित्यराणा नावाच्या तरुणाला गुरुवारी राखी बांधली होती. यामुळे संतप्त झालेल्या आदित्यराणाच्या नातेवाईक महिला संजीवनी गवळी, उषा गवळी, बेबीताई बनसोडे यांनी ममताच्या घरात घुसून बेलन्याने मारहाण केली. तसेच घरातील टिव्ही, काच, आरसा फोडून नुकसान केले. याबाबत गुरुवारी रात्री तिन्ही महिला विरुद्ध तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.