तुळजाभवानी मंदिरात दहा दिवस धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद; केवळ मुखदर्शनच घेता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:33 IST2025-07-31T13:31:40+5:302025-07-31T13:33:11+5:30

धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद राहणार असल्याची माहिती बुधवारी तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली.

For the next ten days, only the face of Tulja Bhavani will be available for worship | तुळजाभवानी मंदिरात दहा दिवस धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद; केवळ मुखदर्शनच घेता येणार

तुळजाभवानी मंदिरात दहा दिवस धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद; केवळ मुखदर्शनच घेता येणार

तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंह गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत १ ते १० ऑगस्टपर्यंत जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद राहणार असल्याची माहिती बुधवारी तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली.

श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याची गंभीर बाब काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. यानंतर, मंदिर संस्थानने गाभाऱ्यासह इतरही भागात जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. पुरातत्त्व विभागाच्या निगराणीखाली आवश्यक कामे निश्चित केल्यानंतर ५८ कोटी रुपये खर्चून या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. सध्या मंदिर परिसरातील कामे सुरू आहेत. दरम्यान, आता १ ते १० ऑगस्ट या कालावधीत सिंह गाभाऱ्यातील कामे केली जाणार आहेत. 

त्यामुळे भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देता येणार नसल्याने धर्मदर्शन आणि पेडदर्शन या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने केला आहे. त्यामुळे आता भाविकांना सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन घ्यावे लागणार आहे, तसेच ज्या भाविकांचे सिंहासन आणि अभिषेक पूजा असेल, त्यांना सकाळी सहा ते दहा व सायंकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत तुळजाभवानीचे दर्शन मिळणार आहे. दरम्यान, सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये भाविकांना भवानीशंकरपासून मुखदर्शन घेता येईल, असे मंदिर संस्थानने कळविले आहे.

Web Title: For the next ten days, only the face of Tulja Bhavani will be available for worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.