जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:33+5:302021-05-03T04:26:33+5:30

उस्मानाबाद : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा कोरोना साथीमुळे मर्यादित ...

Flag hoisting at the Collector's Office | जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

googlenewsNext

उस्मानाबाद : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा कोरोना साथीमुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा झाला. शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन गिरी, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, नायब तहसीलदार संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Flag hoisting at the Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.