आवले यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:18+5:302021-08-18T04:38:18+5:30
मराठी कन्या शाळा उस्मानाबाद : येथील मराठी प्राथमिक कन्या शाळेत समता सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष एडके, प्राथमिक प्रशालेचे ...

आवले यांच्या हस्ते ध्वजारोहण
मराठी कन्या शाळा
उस्मानाबाद : येथील मराठी प्राथमिक कन्या शाळेत समता सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष एडके, प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापक मारकड व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एडके यांच्या उपस्थितीत संस्थेचे सदस्य व प्रशासकीय अधिकारी थोरात यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन व ध्वजारोहण करण्यात आले. पिसाळ यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा रंजक इतिहास सांगितला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पिसाळ यांनी केले तर आभार सुधीर पाचकुडवे यांनी मानले.
वीरशैव जंगम मठ
उस्मानाबाद : येथील वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे, विश्वस्त विठ्ठल विभुते, परमेश्वर वाले आदी समाजबांधव उपस्थित होते.
जयप्रकाश विद्यालय
उस्मानाबाद : तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी रुक्मिणबाई मुदगुडकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, तालुका शिवसेना उपप्रमुख राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, जयप्रकाश कोळगे, मुख्याध्यापिका शिवकन्या सांळुके, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे आदी उपस्थित होते.