माकणीतील पाच पहिलवानांनी पटकावले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:50+5:302021-09-27T04:35:50+5:30
पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी आक्रमक खेळ करून महाविद्यालयाला पदक मिळवून दिले होते. या कामगिरीमुळे त्याची ...

माकणीतील पाच पहिलवानांनी पटकावले सुवर्णपदक
पनवेल येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी आक्रमक खेळ करून महाविद्यालयाला पदक मिळवून दिले होते. या कामगिरीमुळे त्याची रोहतक येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चुरशीच्या लढतीत उत्कृष्ट कामगिरी करीत पाच सुवर्णपदकांची कमाई केली. या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये पूजा बनसोडे, पायल बनसोडे, ऋषिकेश घाडगे, आकाश एरंडे, सदानंद बनसोडे व पवन भुजबळ यांचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या वतीने या सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. सी. पाटील, डॉ. बिराजदार, डॉ. ऐल्लुरे, डॉ. गायकवाड, डॉ. निर्मळे, पर्यवेक्षक जगताप, प्रा. मोरे, प्रा. लोमटे, माजी प्राचार्य मुसांडे आदींनी उपस्थित राहून राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.