शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आरोग्यमंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; पोलीस घटनास्थळी, आरोपींचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 09:15 IST

धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्या जवळील घरासमोर मध्यरात्री १२:३७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत गोळीबार करून पळ काढला.

सोनारी (जि.धाराशिव) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

आरोग्यमंत्री सावंत यांच्या परंडा मतदारसंघात गावभेटी सुरू आहेत. यादरम्यान नियमित वादंगाचे प्रसंग उद्भवत आहेत.  आरोप प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्या जवळील घरासमोर गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्री १२:३७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत गोळीबार करून पळ काढल्याची माहिती येथील सुरक्षा रक्षकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व परंडा पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी घटनेने खळबळ...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी घटनास्थळापासून अवघ्या १२ किमी अंतरावरील परंडा येथे सभा होणार आहे. या सभेचे पूर्ण नियोजन धनंजय सावंत करीत आहेत. या सभेपूर्वी झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतCrime Newsगुन्हेगारी