तेर येथे वित्तीय साक्षरता शिबीर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST2021-01-16T04:36:36+5:302021-01-16T04:36:36+5:30
शिबिरास बँकेचे लातूर येथील मुख्य प्रबंधक मिलींद जरीपटके, मुख्य प्रबंधक भास्कर मणी, उपप्रबंधक पवनकुमार पाटील, किरण चांदोडकर, बँकेच्या ...

तेर येथे वित्तीय साक्षरता शिबीर उत्साहात
शिबिरास बँकेचे लातूर येथील मुख्य प्रबंधक मिलींद जरीपटके, मुख्य प्रबंधक भास्कर मणी, उपप्रबंधक पवनकुमार पाटील, किरण चांदोडकर, बँकेच्या तेर शाखेचे शाखा प्रबंधक निलाजन आचार्जी यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय पेंशन योजनेच्या अखत्यारितील अटल पेंशन योजना, जनधन योजना, मुद्रा लोन, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत १२ रूपयांमध्ये २ लाखाचा अपघात विमा, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत वार्षिक प्रिमीयम ३३० रूपयांमध्ये २ लाख रूपयांचा जीवन विमा, पीक कर्ज तसेच बँकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या विविध याेजनांची माहिती देण्यात आली. यावेळी एस. एस. मेटे, तलाठी श्रीधर माळी, महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्यध्यापक एस. एस. बळवंतराव, डॉ. सूर्यकांत खटिंग, किशोर कदम, अनिल जाधव, विजय जगदाळे आदींची उपस्थिती हाेती.