मारहाण प्रकरणात दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST2021-04-13T04:30:59+5:302021-04-13T04:30:59+5:30

१० एप्रिल रोजी बोरगाव (राजे) येथील शैलेश गोविंद पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून शेतीकडे जात होते. यावेळी शाहीद पटेल यांनी ...

Filed two charges of assault | मारहाण प्रकरणात दोन गुन्हे दाखल

मारहाण प्रकरणात दोन गुन्हे दाखल

१० एप्रिल रोजी बोरगाव (राजे) येथील शैलेश गोविंद पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून शेतीकडे जात होते. यावेळी शाहीद पटेल यांनी त्यांचा ट्रॅक्टर दुचाकीला आडवा लावला. यावरून त्या दोघात वाद होऊन जावेद पटेल, कलिम, इस्माईल पठाण, अकलाग, मैदाबी, शहारूख शेख यांनी पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

दुसरी फिर्याद शाहीद पटेल यांनी दिली. यात शाहीद पटेल हे त्यांचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना शैलेश पाटील यांनी त्यांच्या ट्रॅक्टरला कट मारून पुढे जाऊन शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात वाद होऊन शैलेश, प्रदीप, ओंकार व महेश यांनी शाहीद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या दोन्ही फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Filed two charges of assault