शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महिला उपनिरीक्षकाला चौथ्या मजल्यावरून ढकलले; कॉन्स्टेबलला ७ वर्ष सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:12 PM

Crime news in Osmanabad : मनीषा रामदत्त गिरी या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत होत्या. तेव्हा याच ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या आशिष ज्ञानाेबा ढाकणे याच्याशी त्यांचा परिचय झाला होता.

ठळक मुद्देजखमी मनीषा गिरी या शुद्धीत नसल्याने तपासाला पुरेशी गती मिळू शकत नव्हती. जवळपास महिनाभराने त्या ठणठणीत झाल्यानंतर २९ जून २०१९ रोजी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.

उस्मानाबाद : शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत असताना एका महिला पोलीस उपनिरीक्षकास त्यांच्या राहत्या घरातून खाली ढकलून देत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॉन्स्टेबलला ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी न्यायालयाने सुनावली आहे. या बहुचर्चित प्रकरणाला तपासातून वेगळे वळण मिळाले होते. ( The female sub-inspector was pushed from the fourth floor by constable, incident from Osmanabad ) 

मनीषा रामदत्त गिरी या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत होत्या. तेव्हा याच ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या आशिष ज्ञानाेबा ढाकणे याच्याशी त्यांचा परिचय झाला होता. त्यानंतर गिरी यांची शहर ठाण्यात बदली झाली होती. त्यानंतर ३१ मे २०१९ रोजी सकाळी गिरी या राहत असलेल्या घरातील चौथ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी आनंदनगर ठाण्यात त्याच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद करून घेण्यात आली. मात्र, पोलीस तपासात हा प्रकार आत्महत्येचा नसल्याचे लक्षात आले होते. जखमी मनीषा गिरी या शुद्धीत नसल्याने तपासाला पुरेशी गती मिळू शकत नव्हती. 

जवळपास महिनाभराने त्या ठणठणीत झाल्यानंतर २९ जून २०१९ रोजी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. आशिष ढाकणे याने गिरी यांना चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे जबाबातून स्पष्ट झाल्यानंतर तपास पथकाने त्यास तातडीने ताब्यात घेतले आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यावर नोंदविण्यात आला. गेली २ वर्षे तो काेठडीतच आहे. या प्रकरणाचा तपास उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मनीषा गिरी यांचा जबाब, तपास पथकाने जमा केलेले सबळ पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आशिष ढाकणे यास खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरत ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने आरोपीस सुनावला. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस