बापानेच घडवून आणला तिघांच्या मदतीने मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 04:36 PM2019-04-08T16:36:36+5:302019-04-08T16:37:17+5:30

मुलगा दारू पिऊन घरी घालायचा गोंधळ

father murdered his son with the help three | बापानेच घडवून आणला तिघांच्या मदतीने मुलाचा खून

बापानेच घडवून आणला तिघांच्या मदतीने मुलाचा खून

googlenewsNext

नळदुर्ग (जि़उस्मानाबाद) : मुलाच्या त्रासाला वैतागून लोहगाव येथील एका पित्यानेच इतर तिघांच्या मदतीने मुलाचा खून घडवून आणल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे़ याबाबत रात्री उशिरा शिवाजी भैैरु डबडे  पित्यासह इतर तिघांवर नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील आरोपी पिता शिवाजी भैैरु डबडे यांचा मुलगा डिगंबर डबडे हा नेहमीच दारु पिऊन घरी गोंधळ घालायचा़ त्यामुळे परिवारातील सर्व सदस्य त्याला वैतागले होते. यातूनच शिवाजी डबडे यांनी मुलाचा काटा काढायचे ठरविले. लोहगाव येथील नेताजी ज्योतिबा डबडे, महादेव वैजिनाथ मारेकर व कालिदास बलभीम जाधव  यांच्या मदतीने शिवाजी डबडे यांनी शुक्रवार व शनिवारच्या रात्री मुलाचा खून घडवून आणला. 

ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ यानंतर नळदुर्ग पोलिसांनी पंचनामा केला़ शिवानंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपरोक्त चारही आरोपींविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेनंतर नळदुर्ग पोलिसांनी वेगाने तपास करीत चारही आरोपींना अटक केली आहे़ त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांनाच ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असा घडविला खून...
पिता शिवाजी डबडे वगळता इतर तीन आरोपींनी डिगंबर यास दुचाकीवर बसवून शुक्रवारच्या रात्री दारु पाजण्यास नेले़ तेथे दारुत विष मिसळून ते डिगंबरला पाजले़, याद्वारे तो मयत झाला की, नाही याची खात्री होत नसल्याने त्यास दोरीच्या साहाय्याने बाभळीच्या झाडास गळफास दिला़ यानंतर त्याचे प्रेत शेंडगे यांच्या घराजवळील कॅनॉलमध्ये फेकून दिले.

Web Title: father murdered his son with the help three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.